एसटीचे अध्यक्ष गोरे ‘इन ऍक्शन’ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2012

एसटीचे अध्यक्ष गोरे ‘इन ऍक्शन’


एसटीचे अध्यक्ष गोरे ‘इन ऍक्शन’
मुंबई - एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष जीवनराव गोरे इन ऍक्शन झाले असून त्यांनी भेटीगाठींसह अधिकार्‍यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबई सेंट्रल आगाराला दिलेल्या भेटीत त्यांनी कर्मचार्‍यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच गाड्यांसह आगारातील अस्वच्छतेबाबत संबंधित अधिकार्‍यांना फैलावर घेतले. त्याचबरोबर गाड्या वेळेत सोडण्याबाबतही सूचना दिल्या.

एसटीच्या वाहतूक विभागाचा उडालेला बोजवारा आणि गाड्यांमधील अस्वच्छतेची गंभीर दखल जीवनराव गोरे यांनी एसटीच्या राज्यातील सर्व आगारांसह कार्यशाळांना भेटी देत कर्मचार्‍यांच्या तक्रारी जाणून घेण्याचा धडाका लावला आहे. त्यानुसार आज गोरे यांनी मुंबई सेंट्रल आगाराची पाहाणी केली. यावेळी आगारातील अस्वच्छतेबद्दल अधिकार्‍यांना झापले. तसेच आगारातून सुटणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्या वेळेत सोडण्याबाबत बजावले. गोरे यांनी कर्मचार्‍यांच्या तक्रारींबरोबरच एसटीच्या दृष्टीने चांगल्या सूचनाही ऐकून घेतल्या.

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असलेल्या एसटीने शहरापासून खेडोपाड्यापर्यंत प्रवाशांना सेवा देऊन एसटी आपल्या दारी असल्याचे दाखवून द्यावे. प्रवासी हेच एस्टीचा आधार असल्याने चालक-वाहकांनी त्यांच्याशी आपलेपणाने वागावे असेही गोरे यांनी कर्मचार्‍यांना सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS