शिवसैनिकांची ढोबळे यांच्या विरोधात निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2012

शिवसैनिकांची ढोबळे यांच्या विरोधात निदर्शने

शिवसैनिकांची ढोबळे यांच्या विरोधात निदर्शनेमुंबई - राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी दलित महिलांवरील अत्याचाराबाबत केलेल्या विधानावर मुंबईतही तीव्र पडसाद उमटले. गोरेगाव येथे संतप्त शिवसैनिकांनी ढोबळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांचा पुतळा जाळून निषेध केला.


दलित महिलेवर अथवा मुलीवर बलात्कार झाल्यास मोर्चे न काढता तिच्या मुलांनी किंवा कुटुंबांतील सदस्यांनी उच्च शिक्षण घेऊन वकील व्हावे, न्यायाधीश व्हावे आणि त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा, असे तारे तोडत पीडित महिलेला पैशांची मदत लागल्यास मी मदत करेन, असे विधान ढोबळे यांनी सोमवारी नागपुरात एका संमेलनात केले होते. त्यांच्या या विधानामुळे संतापलेल्या काही महिलांनी ढोबळे यांच्या गाडीवर चपला फेकल्या होत्या. त्यानंतर आज त्याचे गोरेगावमध्येही पडसाद उमटले. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र.५१ च्या नगरसेविका प्रमिला शिंदे आणि शाखाप्रमुख संजय पावले यांच्या नेतृत्त्वाखाली संतप्त शिवसैनिकांनी लक्ष्मणराव ढोबळे यांचा पुतळा जाळला आणि त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. यावेळी अनिता वानखेडे, दर्शना पोळेकर, शबाना ठाकूर, उमा मोरे, बाळा सोनवणे, महेंद्र इंगवे, जे.बी.परमार, मारुती माने आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS