बौद्ध भंतेना धमकावण्याचा प्रयत्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2012

बौद्ध भंतेना धमकावण्याचा प्रयत्न

बौद्ध भंतेना धमकावण्याचा प्रयत्न
मुंबई / अजेयकुमार जाधव
    नागपाडा परिसरातील चंद्रमणी बुद्ध विहारात वास्तव्यास असलेल्या भंतेना आसाम किवा ब्राम्हदेशामधील  व्यक्तिरेखेशी साधर्म्य असल्याने शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार नागपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
    नागपाडा येथी चंद्रमणी बुद्ध विहारमध्ये भन्ते साधनानंद हे आपल्या सहकाऱ्यांसह वास्तव्यास होते. ९ ऑगस्ट रोजी रात्री इतर भन्ते व भन्ते साधनानंद झोपले असतानाच रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी येवून बुधाविहाराच्या बाहेरील दरवाजा जोराने ठोकवून बौध्द भंतेना शिवीगाळ केली. विहाराच्या बाहेरून शिवीगाळ व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने वेळीच आतील भंते साधनानंद यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांची चाहूल लागताच सदर अज्ञात इसमांनी पळ काढला.
    सदर प्रकाराबाबतचा अदखलपात्र गुन्हा नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आला आहे. सध्या बुद्धविहार परिसरात पोलसांनी आपले कर्मचारी तैनात केले असून भंतेना काही इजा होऊ नये यासठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आसाम व ब्रम्हदेश (म्यानमार) येथे एका विशिष्ट समूहावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. भन्ते साधनानंद हे त्या परिसरातील व्यक्तिरेखेला समरूप दिसत असल्याने त्यंच्या मध्ये भीती निर्माण व्हावी यासाठी धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर येत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS