हिंसाचार प्रकरणी आरोपींना १९ पर्यंत कोठडी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 August 2012

हिंसाचार प्रकरणी आरोपींना १९ पर्यंत कोठडी

हिंसाचार प्रकरणी आरोपींना १९ पर्यंत कोठडी

आसाममध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी आझाद मैदानात अल्पसंख्याक समुदायाने काढलेल्या रॅलीमध्ये झालेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आज (रविवार) २३ जणांना अटक केली. या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता, सर्वांना १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, आज सकाळपासून मुंबईतील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. शनिवारी दुपारी हिंसक जमाव आणि पोलिसांत उसळलेल्या धुमश्‍चक्रीत दोघे ठार, तर 54 जण गंभीर जखमी झाले होते. जखमींत 41 पोलिस, प्रसिद्धिमाध्यमांचे तीन प्रतिनिधी आणि नागरिकांचा समावेश आहे.

हिंसाचाराचा निषेध
आझाद मैदानात निदर्शनांच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांनी अल्पसंख्याक समाजाची मान शरमेने खाली घालायला लावली. समाजाला बदनाम करण्याचा हा पूर्वनियोजित कट असून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी "रझा अकादमी'चे प्रमुख सईद नुरा यांनी आज (रविवार) केली.
   आझाद मैदानातील हिंसाचार हा निदर्शनांच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या गटांपैकी एका गटाचा पूर्वनियोजित कट होता. आसाम व म्यानमार येथील हिंसेचा शांतता मार्गाने निषेध करण्यासाठी आलेला हजारोंचा समुदाय आझाद मैदानात बसला होता. या वेळी दंगा भडकवण्याच्या तयारीत असलेल्या दुसऱ्या गटाने मैदानाबाहेर अचानक तोडफोडीला आणि पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. ज्यांनी ही दंगल भडकवली अशा लोकांना पकडून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. अतिशय नियोजनबद्ध आखलेल्या या कटामुळे संपूर्ण समाजाला मान खाली घालावी लागली. या निदर्शनाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक येतील, असे वाटले नव्हते. ज्या लोकांनी हे केले, ते अतिशय तयारीने निदर्शनाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा शोध घेऊन, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असेही मौलाना अश्रफ यांनी सांगितले. 
आझाद मैदानजवळील 250 वाहनांची चौकशी
आझाद मैदान परिसरात शनिवारी (ता. 11) पासून उभ्या असलेल्या सुमारे 250 गाड्यांचे गूढ वाढले असून या गाड्यांचे मालक कोण, याची चौकशी केली जाते आहे. रझा अकादमीने आयोजित केलेला मोर्चा अचानक हिंसक होण्याचा प्रकार सध्या उच्चस्तरीय तपासाचा विषय आहे. या तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मोर्च्याने हिंसक वळण घेतल्यानंतर या मोटारसायकली नेण्यासाठी कोणीही परतलेले नाही. या वाहनांचे क्रमांक मुंबईशी संबंधित चारही पारपत्र कार्यालयांना पाठवण्यात आले आहेत. या वाहनांची नोंद नक्‍की कुणाच्या नावे आहे, याचाही शोध सुरू आहे. मुंबई क्राईम ब्रॅंचने यासंबंधात चौकशी सुरू केली आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS