महिला, बालकांचा जबाब पोलिस ठाण्यात घेणार नाही
एखाद्या प्रकरणात जर तक्रारदार किंवा साक्षीदार महिला, 15 वर्षांखालील बालके व अपंग व्यक्ती असतील तर त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी त्यांना पोलिस ठाण्यात बोलविले जाणार नाही, अशी माहिती आज (सोमवार) राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.
पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांच्या वतीने आज देण्यात आली. राज्यभरातील पोलिस ठाण्यांना या परिपत्रकाचे निर्देश देण्यात आलेले आहेत की महिला, बालके व अपंग व्यक्तींचा जबाब नोंदविण्यासाठी त्यांना पोलिस ठाण्यात येण्याचे समन्स पाठवू नका. जर या व्यक्तींचा जबाब नोंदवायचा असेल तर संबंधित पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवावा, असेही परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment