पत्रकारांना सुरक्षा मिळालीच पाहिजे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 August 2012

पत्रकारांना सुरक्षा मिळालीच पाहिजे

पत्रकारांना सुरक्षा मिळालीच पाहिजे

महाराष्ट्रातील पत्रकारांना गुंडांपासून आणि त्यांच्या मालकांपासून असे दोन प्रकारचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. आझाद मैदान परिसरामध्ये पत्रकारांवरदेखील हल्ला झाला. या घटनेचा तपास सुरू आहे. जे गुन्हेगार आहेत ते सुटणार नाहीत. तपासावर गृह खात्याचे बारीक लक्ष आहे. माध्यमांच्या गाड्यांचे जे नुकसान झाले त्याचे पैसे त्यांना विमा कंपन्यांतून मिळतील. ज्या गोष्टींचा विमा नव्हता अशा गोष्टींची नुकसानभरपाई माध्यमांना मिळावी म्हणून गृहखात्यातर्फे मी नक्कीच मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करेन, असे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आश्‍वासन दिले. 
   मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणार्‍या आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पाटील बोलत होते. यंदा आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. पत्रकार संघातर्फे चालविण्यात येणारा पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
   गेली २१ वर्षे पत्रकारांवर हल्ले होत आहेत. पण पत्रकारांवर हल्ले करणार्‍यांवर अजून गुन्हे दाखल होत नाहीत. पत्रकारांना सुरक्षितता मिळालीच पाहिजे. यासंबंधीचा कायदा लवकरात लवकर झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS