रिपाइंचे 'जेल भरो' स्थगित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2012

रिपाइंचे 'जेल भरो' स्थगित


रिपाइंचे 'जेल भरो' स्थगित
मुंबई - केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिपाइंचे 16 ऑगस्टपासून सुरू होणारे "जेल भरो' आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दादरच्या इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाने "जेल भरो' आंदोलन जाहीर केले होते; परंतु विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे हे आंदोलन सध्या तरी स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS