देवकरांच्या हस्ते कडेकोट पोलिस बंदोबस्तात झेंडावंदन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2012

देवकरांच्या हस्ते कडेकोट पोलिस बंदोबस्तात झेंडावंदन

देवकरांच्या हस्ते कडेकोट पोलिस बंदोबस्तात झेंडावंदन 
deokar.jpg
परिवहन राज्यमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी झेंडावंदन करू नयेअशी मागणी करत घोषणाबाजी करणाया ३९महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले या कारवाई नंतर देवकरांच्या हस्ते कडेकोट पोलिस बंदोबस्तात झेंडावंदन झाले आणि जिल्ह्यात नव्या राजकीय संघर्षाला तोंड फुटले 
    जळगाव जिल्ह्यात झालेल्या घरकुल घोटाळ्यात देवकरहे एक आरोपी आहेत सुप्रीम कोर्टाने जामीन दिलातरी घोटाळ्याच्या आरोपांतून त्यांची सुटका झालेली नाही अशा परिस्थितीत एका आरोपीच्या हस्ते झेंडावंदन करुन राष्ट्रध्वजाचा अवमान करू नका अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्यावतीने करण्यातआली होती सकाळी देवकर यांच्या घरापुढे जमूनसेनेच्या महिला शाखेने काळे झेंडे दाखवले आणि 'हुतात्म्यांना मान द्या राष्ट्रध्वजाचा मान राखा अशी घोषणाबाजी केली अखेर पोलिसांनी ३९ महिलांना ताब्यात घेतले आणि बंदोबस्तात देवकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणले तिथे तातडीने झेंडावंदन करण्यात आले

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS