ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रभाकर कुंटे यांचे निधन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2012

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रभाकर कुंटे यांचे निधन


ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रभाकर कुंटे यांचे निधन


कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रभाकर कुंटे यांचे आज बुधवारी मुंबईत निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
   कुंटे यांचा ३० सप्टेंबर १९२० रोजी अलिबागमध्ये जन्म झाला होता. तरुणपणापासूनच ते राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते. अनेक कामगार संघटनांशी त्यांचा संबंध होता. मुंबईतील धारावी मतदारसंघातून १९७२ साली कुंटे विधानसभेत निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी स्व. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. कुंटे यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र चऴवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात ते सामील झाले होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS