पोलिस गोळीबाराची चौकशी करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2012

पोलिस गोळीबाराची चौकशी करा


पोलिस गोळीबाराची चौकशी करा
  आझाद मैदानावरील मुस्लिम आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची चौकशी करावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात सादर झाली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तिघांनी केलेल्या याचिकेवर गुरुवारी (ता. 16) सुनावणी होईल. 
   पोलिस गोळीबारात जखमी झालेले नजर मोहम्मद सिद्दिकी, अकबर रौनक खान आणि शेख जुनैद अब्दुल रशीद यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदोलनाच्या दिवशी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌, जे. जे. उड्डाणपूल परिसरात रमजान ईदच्या खरेदीसाठी आलो होतो; त्या आंदोलनाशी आपला काहीही संबंध नव्हता. पोलिसांनी पाठलाग करून आपल्यावर गोळ्या झाडल्या, असा त्यांचा आरोप आहे. 
   पोलिसांनी अनेक निरपराध व्यक्तींवर गोळ्या झाडल्या असून, त्या गोळीबाराची चौकशी करावी. पोलिस अशी चौकशी निष्पक्षपणे करू शकणार नाहीत; त्यामुळे चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणेची नियुक्ती करावी. चौकशीवर उच्च न्यायालयाने देखरेख करावी आणि दोषी पोलिसांवर गुन्हे नोंदवावेत, अशा मागण्या अर्जदारांनी केल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS