पालिका शाळा खाजगीकरणा विरोधात २३ ऑगस्टला पुरोगामी पक्ष संघटनांचा मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2012

पालिका शाळा खाजगीकरणा विरोधात २३ ऑगस्टला पुरोगामी पक्ष संघटनांचा मोर्चा

पालिका शाळा खाजगीकरणा विरोधात २३ ऑगस्टला पुरोगामी पक्ष संघटनांचा मोर्चा
मुंबई / विजया अजेयकुमार जाधव
 
मुंबई महानगर पालिकेच्या शाळा एंन जी ओं, खाजगी संस्थाच्या ताब्यात देण्याच्या सेना भाजपच्या निर्णय विरोधात भारिप बहुजन महासंघ पक्षाच्या पुढाकाराने प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा खाली कम्युनिस्ट पक्ष, आंबेडकरी संघटना यांच्याकडून २३ ऑगस्ट रोजी पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांवर मोर्चे काढणार आहेत.
पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या  साढेचार लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क डावलून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप धोरणा अडून कॉर्पोरेट , एनजीओं, खाजगी शिक्षण संस्थांच्या ताब्यात देण्याचा निर्णय जनविरोधी तसेच संविधानाच्या मुल्यांची पायमल्ली करणारा आहे. पालिकेच्या शाळांमध्ये पुरेसा कायम स्वरूपी शिक्षक, कर्मचारी, माळी, सुरक्षारक्षक नाहीत. अनेक शाळा दोन शिक्षकांवर चालत आहेत. अशा शाळांमध्ये शिकणे शिकवणे होत नाही. शिक्षकांवर शिक्षणा व्यतिरिक्त कामे लादली जातात. एखा वर्ग खोली मध्ये ६० टे ७० विद्यार्थी फरशीवर बसवले जातात.बस्यला पुरेसे बेंच नाही, प्यायला पाणी नाही, संडास मुताऱ्या नाहीत, विकलांग विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत अशी पालिका शाळांची दैनावस्था आहे. 
पालिका शाळा खाजगी संस्थाना दिल्यास तेथे सामान्य लोक दाद मागू शकणार नाहीत. अश्या संस्थांमुळे वेगवेगळ्या शाळांमधून वेगवेगळे नियम लावले जातात. अश्या शालामुळे विद्यार्थी पालक तसेच श्हीक्षक व इतर कर्मचार्यांच्या हक्कांवर गदा येणार आहे. यामुळे खाजगीकरणाचे धोरण तबत्तोब रद्द करून पालिका शाळांमधून सुधार करून शिक्षक व इतर कर्मचारी कायमस्वरूपी पद्धतीने नियुक्त करावे.किमान १० वी पर्यंतच्य सर्व मुलामुलींच्या शिक्षणाची जवाबदारी पालिकेने घेवून ती पूर्णपणे पार पाडावी,सर्व मुला मुलीना मुलभूत सोयी सुविधा नियमित व वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात, पालिका शाळा, मैदाने कोणाही खाजगी संस्था किवा व्यक्तींना देवू नये इत्यादी मागण्यांबाबत सदर मोर्चे काढण्यात येणार आहेत.-- 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS