मुंबईसह काही भागात जोरदार पाऊस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2012

मुंबईसह काही भागात जोरदार पाऊस

मुंबईसह काही भागात जोरदार पाऊस
रविवार ओलाचिंब करुन टाकण्यासाठी पाऊस हजरझाला आहे मुंबई ठाणे कल्याण भिवंडीपरिसरात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे .आतापर्यंत मंबईच्या पश्चिम उपनगरात ४१ ३ मिमिआणि पूर्व उपनगरात ४३ ६ मिमि पावसाची नोंदझाली आहे .
    मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्याने काही लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून रेल्वे गाड्या धिम्या गतीने धावत आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस आलेला नव्हता. त्यामुळे येथील धरणांमध्ये मुबलक पाणी साठा झालेला नव्हता. आज सकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. विदर्भामधील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, धानोरी, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. मराठवाड्यात मात्र अजूनही कोरडा असल्याचे समजते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS