इंटरनेट स्वातंत्र्याचा आदर करा - अमेरिका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

इंटरनेट स्वातंत्र्याचा आदर करा - अमेरिका

इंटरनेट स्वातंत्र्याचा आदर करा - अमेरिका

इंटरनेटवरुन अफवा पसरविण्यात आल्याने भारताने २५० साईट्सवर बंदी घातली आहे. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्युलँड यांनी भारताने इंटरनेट स्वांतंत्र्याचा आदर केला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
 
सोशल नेटवर्किंग साईट्स आणि ब्लॉगवरुन पसरविण्यात आलेल्या धमक्या आणि इशान्येकडील लोकांचे होणारे पलायन, या प्रकरणावर भारताचा तपास सुरु आहे. या तपास प्रक्रियेवर अमेरिकेचे पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
 
अमेरिका नेहमीच इंटरनेटला स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने असून, भारताने या तपासादरम्यान मूलभूत अधिकार, कायदा आणि स्वातंत्र्य याचा आदर राखावा, असे मत न्युलँड त्यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS