तरुणींना देहविक्रयाच्या व्यवसायात लोटणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2012

तरुणींना देहविक्रयाच्या व्यवसायात लोटणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले

तरुणींना देहविक्रयाच्या व्यवसायात लोटणारे
आंतरराष्ट्रीय रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले

दुबईत डान्स परफॉर्मन्सच्या नावाखाली नेऊन तरुणींना देहविक्रयाच्या व्यवसायात लोटणारेआंतरराष्ट्रीय रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर मंगळवारीरात्री पोलिसांनी ३६ तरुणींची सुटका केली रात्री साडेआठच्या एअर इंडियाच्या विमानाने या तरुणीदुबईला जाणार होत्या सुटका करण्यात आलेल्या तरुणी मुंबई आणि ठाणे परिसरातील आहेत 
    डान्स परफॉर्मन्सच्या नावाखाली तरुणींना दुबईत नेऊन देहविक्रयाच्या जाळ्यात ओढले जातअसल्याची खबर दोन आठवड्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती परंतुकारवाईसाठी पोलिसांकडे ठोस पुरावा नव्हता एका तरुणीने दोन दिवसांपूर्वी समाजसेवा शाखेशी संपर्कसाधला तिने स्टेज शोच्या माध्यमातून चालणाऱ्या या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला तिहीअशाप्रकारच्या फसवणुकीची बळी ठरली होती पोलिसांनी एसीपी वसंत ढोबळे यांच्यासह काहीअधिकाऱ्यांच्या पथकाला दिल्लीत पाठवले दिल्ली विमानतळावर केलेल्या धडक कारवाईत सीबीआयइमिग्रेशनचे अधिकारीही सहभागी झाले होते सुटका केलेल्या तरुणींपैकी ९० टक्के मुली मुंबई परिसरातील आहेत उर्वरित मुली राजस्थानउत्तर प्रदेश दिल्लीतील आहेत.
        मुंबईत आणल्यानंतर या मुलींना कोर्टासमोर हजर केले कोर्टाने त्यांना सुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत मुंबईतले डान्सबार बंद झाल्यानंतर बेरोजगार बारबालांना या धंद्यात ओढण्यात येत होते सिनेमात काम करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या स्ट्रगलर मुलीही पैशांसाठी या स्टेज शोमध्ये काम करण्यास तयार होत असत या तरुणींना रॅकेटमध्ये ओढणाऱ्यांना अटक करण्याचे प्रयत्न आहेत अशी माहिती समाजसेवा शाखेचे उपायुक्त बी जी शेखर यांनी दिली आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS