वसंतदादा कॉलेजचे २ मजले अनधिकृत
सायन येथील वसंतदादा पाटील कॉलेजच्या इमारतीचा पाचवा आणि सहावा मजला अनधिकृतअसल्याची माहिती नुकतीच उघड झाली आहे . या जागेवर नुकतीच मान्यता मिळालेले पदव्युत्तरपदवी शिक्षणाचे वर्ग भरविण्यात येणार आहेत . याप्रकरणी मुंबई महापालिकेनेही कॉलेजला नोटीसबजावली होती . असे असतानाही या वर्गांसाठी येथे प्रवेश प्रकिया सुरू आहे .
या कॉलेजमध्ये मास्टर्स इन इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे . याअभ्यासक्रमासाठी कम्प्युटर आणि टेलिकम्युनिकेशन या दोन शाखांना अखिल भारतीय तंत्रशिक्षणपरिषदेने परवानगी दिली आहे . दोन्ही शाखांमध्ये प्रत्येकी २४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. याचा उल्लेख कॉलेजच्या माहितीपुस्तिकेत करण्यात आला आहे . कॉलेजच्या सध्याच्या इमारतीमध्येसर्व वर्ग भरलेले असून या नव्या अभ्यासक्रमांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या दोन मजल्यांवरजागा देण्यात येणार आहे . याशिवाय येथे पदवीचेही काही वर्ग सुरू करण्यात येणार आहे .
मुंबई महापालिकेने १८ नोव्हेंबर २०११ रोजी कॉलेजला नोटीस बजावली आहे . यानुसार हे दोन्हीमजले अनधिकृत असून कॉलेजने तातडीने यावर योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण करावी अन्यथाकारवाईला सामोरे जावे लागेल , असे स्पष्ट केले होते . यानंतर आजपर्यंत कॉलेजने कोणत्याही प्रकारचेकागदपत्र सादर केलेले नाही , असे माहिती अधिकार कार्यकर्ते देवेंद्र काळे यांनी सांगितले . याप्रकरणीकॉलेजच्या प्राचार्यांशी संपर्क होऊ शकला नाही .


No comments:
Post a Comment