रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण यांची ‘ईडी’कडून चौकशी? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2012

रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण यांची ‘ईडी’कडून चौकशी?


रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण यांची ‘ईडी’कडून चौकशी?




रामदेवबाबा यांचे निकटवर्तीय आचार्य बालकृष्ण यांची 'मनी लाँड्रिंग' प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी होण्याची शक्यता आहे.  

 ईडी चौकशीच्या तयारीत असले तरी बालकृष्ण सध्या विदेश दौर्‍यावर आहेत. बनावट पासपोर्टच्या आधारे त्यांनी केलेल्या व्यवहाराची छाननी करण्याच्या प्रयत्नात ईडी आहे. त्याचबरोबर रामदेवबाबा यांच्या वेदिक ब्रॉड कास्टिंगमधील गुंतवणुकीची चौकशी केली जात आहे. टीव्ही वाहिनीला मिळालेल्या निधीत अनियमितता आढळल्याने ईडी वाहिनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात आरबीआयचा अहवाल प्राप्त झाला असून फोरेक्सचे (विदेशी मुद्रा विनिमय कायदा) उल्लंघन झाले तर नाही ना, असा संशय ईडीला आहे, असे सूत्रांनी सांगितले.  

 रामदेवबाबा आणि बालकृष्ण यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. रामदेवबाबा यांनी विविध संस्थांत गुंतवणूक केली आहे. ईडीने त्यांच्या ट्रस्टची गेल्या वर्षीपासून चौकशी सुरू केली आहे. सीबीआयने बनावट पासपोर्ट प्रकरणात बालकृष्णविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. बालकृष्ण यांनी बनावट पासपोर्टच्या साहाय्याने विदेशात पैसा जमा केल्याचा संशय ईडीला आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणात बालकृष्ण सध्या जामिनावर आहेत. बालकृष्ण यांनी बनावट पदवीच्या आधारे पासपोर्ट मिळवल्याचा गुन्हा गेल्या वर्षी 23 जुलै रोजी दाखल करण्यात आला होता. सीबीआयने येथील विशेष न्यायालयात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS