बँक कर्मचा-यांची संपाची हाक
आठवडाभर ग्राहकांची गैरसोयहोण्याची शक्यता
बँकांना १८ ते २० ऑगस्ट अशा सुट्या जोडून आलेल्या असतानाच , देशभरातील सरकारी बँककर्मचाऱ्यांनी २२ व २३ रोजी संपाची हाक दिली आहे . सरकारसोबत २१ रोजी होत असलेलीसामोपचाराची बोलणी फिस्कटल्यास संप अटळ असून त्यामुळे आठवडाभर ग्राहकांची गैरसोयहोण्याची शक्यता आहे .
बँकिंग क्षेत्रातील प्रस्तावित सुधारणा , केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या खंडेलवाल पॅनेलच्या शिफारसीआणि कामाचे आउटसोर्सिंग याला विरोध करण्यासाठी ' युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्स ' याविविध कर्मचारी संघटनांच्या संघटनेने संपाचे हत्यार उगारले आहे . सरकार लादू पाहत असलेल्यासुधारणा प्रतिगामी असल्याने कर्मचारी संघटनेने जोरदार विरोध केला आहे . कर्मचारी संपावरजाण्यापूर्वी सामोपचाराने चर्चा करण्यासाठी चीफ लेबर कमिशनर यांनी २१ रोजी संघटनेच्या प्रति निधींना चर्चेसाठी बोलावले आहे . या चर्चेत समेट न झाल्यास मात्र संप होणार असून त्यामुळेग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे .


No comments:
Post a Comment