गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा- राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2012

गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा- राज ठाकरे

गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा- राज ठाकरे 

मुंबईतील हिंसाचारप्रकरणी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्‍याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्‍यावर तोफ डागली असून त्‍यांनी तात्‍काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राज यांनी केली आहे. या मागणीसाठी राज ठाकरे मंगळवारी मोर्चा काढणार आहेत.
   राज ठाकरे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, मुंबईत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. यासंदर्भात स्‍पष्‍ट इशारादेखील पोलिसांना मिळाला होता. तरीही ही घटना घडली. हे पोलिस आयुक्तांचे अपयश आहे. त्‍यांनी तत्‍काळ राजीनामा दिला पाहिजे. राज्‍याच्‍या गृहखात्‍यालाही गांभीर्य नाही. अजित पवार स्‍वतःला टग्‍या म्‍हणतात. तर त्‍यांनी टगेगिरी करुन गृहखाते सांभाळावे आणि यंत्रणा सुधारावी, असे राज ठाकरे म्‍हणाले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS