जन्म दाखल्याची पहिली प्रत मोफत मिळ्णार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2012

जन्म दाखल्याची पहिली प्रत मोफत मिळ्णार

जन्म दाखल्याची पहिली प्रत मोफत मिळ्णार

शाळेतील प्रवेशापासून अनेक कामांमध्ये जन्मदाखला आवश्यक असतो. पालिकेकडून दिला जाणारा हा जन्मदाखला आता मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दाखल्यावर आता जन्मवेळही येणार आहे. नागरिकांना पालिका विभागीय कार्यालयांत जन्मदाखला मोफत मिळणार आहे.
     नागरिकांना जन्मदाखला मोफत मिळावा यासाठी २०११ साली तत्कालीन नगरसेवक ऍड. मनमोहन चोणकर यांनी सभागृहात ठरावाची सूचना केली होती. हा ठराव मंजूर झाला असून यानुसार जन्मदाखल्याची पहिली प्रत मोफत दिली जाणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक प्रतीवर ३० रुपये आकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे नगरसेविका मिनल जुवाटकर यांनी २००८ साली जन्मदाखल्यावर वेळेचाही समावेश करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बडोदा महापालिकेच्या धर्तीवर आता जन्मदाखल्यावर जन्मवेळेचाही समावेश केला जाणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असून जन्मदाखल्यावर जन्माची वेळ नोंदविण्यात येणार आहे.
     दरम्यान जन्मदाखल्यावर जातीचा तसेच रक्तगटाचा उल्लेख असावा त्यामुळे नागरिकांना जातीच्या दाखल्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट कमी होतील, अशी सूचना चोणकर यांनी केली होती. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानुसार जन्मदाखल्यामध्ये बदल करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS