पटनाईक यांच्यावर अँजिओप्लास्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2012

पटनाईक यांच्यावर अँजिओप्लास्टी


 पटनाईक यांच्यावर अँजिओप्लास्टी




arup.jpg
मुंबई- मुंबई माजी पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, डॉ. मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आज सायंकाळी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या उजव्या बाजूतील वाहिनीत ब्लॉक दिसून आल्याने तत्काळ अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुंबईत सीएसटीवर झालेल्या दंगलीमुळे पटनाईक प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर मागील आठवडयात त्यांची बदली राज्य रस्ते सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी करण्यात आली होती. आज सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS