वरिष्ठ पोलीस अधिकारी ऐकणार सर्वसामान्यांचे गार्हाणे
|
| मुंबई : सामान्य जनतेच्या तक्रारी व गार्हाणी ऐकून घेण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यात दस्तुरखुद्द वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर राहणार आहेत. पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह हे शनिवार, 1 सप्टेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहून जनतेच्या तक्रारी ऐकणार आहेत. आयुक्तासारखे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त सांताक्रुझ पोलीस ठाण्यात, गुन्हे शाखेचे सहआयुक्त कुलाबा, आस्थापना विभागाचे सहआयुक्त माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात, तर वाहतूक विभागाचे सहआयुक्त दादर पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले. सिंह यांनी आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी आपल्या हाताखालच्या सर्व अधिकार्यांना कामाला लावले आहे. या अधिकार्यांच्या भेटीच्या वेळी विभागातील अतिरिक्त व उपायुक्तांनी हजर राहण्याची सक्ती केली आहे. जनतेच्या मनात पोलिसांबाबत सहानुभूती निर्माण होण्यासाठी त्यांनी थेट जनतेशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकार्यांना केले आहे. या नवीन उपक्रमामुळे जनतेच्या तक्रारींची उकळ होऊन त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. |
Post Top Ad
31 August 2012
Home
Unlabelled
वरिष्ठ पोलीस अधिकारी ऐकणार सर्वसामान्यांचे गार्हाणे
वरिष्ठ पोलीस अधिकारी ऐकणार सर्वसामान्यांचे गार्हाणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment