कचरा उचलण्याच्या समस्यांचा शेवाळेंकडून आढावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 August 2012

कचरा उचलण्याच्या समस्यांचा शेवाळेंकडून आढावा

कचरा उचलण्याच्या समस्यांचा शेवाळेंकडून आढावा

मुंबईतील विविध विभागात साचणार्‍या कचर्‍यामुळे नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांचा स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आढावा घेतला. यावेळी नगरसेवक मानसी दळवी, सीमा शिवलकर, रत्ना महाले, हेमलता वांगे, हेमांगी वरळीकर सहीत पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.

कचर्‍याच्या समस्येंवर चर्चा करण्यासाठी जी/दक्षिण येथील कार्यालयात शुक्रवारी बैठक बोलवण्यात आली होती. 500 लोकसंख्येमागे एक कामगाराची नियुक्ती, कचरा वाहणार्‍या गाडय़ांच्या संख्या वाढवणे, कचर्‍यासोबत रॅबिट उचलणे, अरुंद गल्ल्यात जेसीबीची व्यवस्था करणे, कचरा संकलन केंद्राची दुरुस्ती आणि कचरा उचलताना भेडसावणार्‍या अनेक समस्या यावेळी नगरसेवकांनी शेवाळेंच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर बोलताना अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी म्हणाले, न्यायालयाने कचरा उचलण्यासाठी युरो-4 ही वाहने वापरणे बंधनकारक केले आहे., मात्र बाजारात त्याचा तुटवडा भासत आहे. 

महापालिकेने न्यायलयात अपील दाखल करून संबंधित वाहन उत्पादक कंपनीस वाहने पुरवण्याचे प्रतिज्ञापत्रक न्यायालयात सादर केल्याने ही समस्या सुटल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS