मोफत अँम्ब्युलन्सचे जाळे विणणार - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 August 2012

मोफत अँम्ब्युलन्सचे जाळे विणणार - महापौर

मोफत अँम्ब्युलन्सचे जाळे विणणार - महापौर
मुंबई : शहरात विविध ठिकाणी घडणारे अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत अँम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या कुशल कर्मचार्‍यांसह 24 तास मोफत अँम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवारी महापौर सुनील प्रभू यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबई शहराची वाढ आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन शहरात मोफत अँम्ब्युलन्स सेवा देण्याबाबत विचार सुरू आहे. अपघातस्थळी रुग्णांपर्यंत वेळेत अँम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासाठी विचार असून शहरात सध्या 50 अँम्ब्युलन्स मोफत उपलब्ध करून द्यावयाच्या असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासाठी 50 ठिकाणी अँम्ब्युलन्स उभी करण्याची केंद्रे निश्चित करण्यात येतील. रस्त्यावर अपघात अधिक प्रमाणात होतात, याही बाबी अभ्यासून अँम्ब्युलन्सची केंद्रे निश्चित करण्यात येतील. यासाठी प्रशासन स्तरावर अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतील 3 वरिष्ठ अधिकार्‍यांची समितीही गठीत करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. या बैठकीला आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी, वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. संजय ओक, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विभागाचे संचालक एल. एस. व्हटकर, पालिका उपायुक्त राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS