आझाद मैदान हिंसाचाराची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा
रझा अकादमीने बोलावलेल्या सभेनंतर उसळलेल्या हिंसाचाराची विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आज (सोमवार) केली. त्याचवेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पदावर अजिबात राहू नये, अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात बोलताना खासदार मुंडे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. हा हिंसाचार अचानक कसा झाला? गुप्तचर विभागाची माहिती असताना पोलिसांनी योग्य ती खबरदारी का घेतली नाही? त्यामुळे या दंगलीची सर्व कारणे तपासली पाहिजेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना मुंडे म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कामगिरी समाधानकारक नाही असे म्हटले असताना, आता वेळ का लावता? आबांना पदावरून काढायला इतका वेळ का लागत आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी या वेळी केली. त्यांच्यासोबत आमदार आशीष शेलार, मधू चव्हाण, अतुल भातखळकर आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment