सोसायट्यांबाबत माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2012

सोसायट्यांबाबत माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर

सोसायट्यांबाबत माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर
मुंबई - सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, त्यातील अडचणींवर उपाय, सहकार कायदा, आदर्श उपविधी, सदनिकेचे हस्तांतरण, वार्षिक सर्वसाधारण सभा, लेखापरीक्षण इत्यादी बाबींविषयी तपशीलवार माहिती आता म्हाडानेही आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यानिमित्ताने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सभासद व पदाधिकाऱ्यांसह सर्वच सर्वसामान्य नागरिकांना सहकारी गृहनिर्माण संस्थांविषयक माहिती एका ठिकाणी उपलब्ध असेल.

म्हाडाच्या www.mhada.org या संकेतस्थळावर उजव्या बाजूस "डेप्युटी रजिस्ट्रार को-ऑपरेटिव्ह सोसायटीज, म्हाडा' या नावाने "लिंक' देण्यात आली आहे.

त्यावर 'क्‍लिक' केल्यानंतर सर्व संबंधित माहिती मिळते. त्यात सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे करावयाच्या अपील संबंधित माहिती, सहकार विभागासंदर्भातील अधिकाऱ्यांच्या नावाची माहिती, शासन निर्णयांसंदर्भातील माहिती उपलब्ध आहे. ही माहिती इंग्रजीबरोबरच मराठीतही उपलब्ध आहे; मात्र त्यासाठी या "लिंक'वर तळाच्या बाजूला "फॉन्ट डाऊनलोड' करण्याचा पर्याय निवडावा लागेल, असे म्हाडाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS