वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2012

वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या


वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या




मुंबई- राज्यातील काही वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  यात मिलिंद म्हैसकर, पी. आर. साबडे, ए.डी. मिसाळ, आबासाहेब ज-हाड, आर. के. मित्तल, नविन सोना, तुकाराम मुंडे, अभिजीत बांगर, श्याम देशपांडे, अण्णासाहेब मिसाळ, सुमन भांगे आणि ए बी उन्हाळे यांचा समावेश आहे.

म्हैसकर यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिवपद, साबडे यांच्याकडे मा. वि. मा. चे कार्यकारी संचालकपद, ए. डी. मिसाळ यांच्याकडे सर्व शिक्षा अभियानाचे संचालकपद, ज-हाड यांच्याकडे महापालिका प्रशासनाचे संचालकपद, मित्तल यांच्याकडे एमपीसीबीचे सचिवपद, सोना यांच्याकडे वस्त्रोद्योगाचे संचालकपद, मुंडे यांच्याकडे सहआयुक्त (विक्रीकर), बांगर यांच्याकडे सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार दिला आहे. याशिवाय जालन्याचे जिल्हाधिकारीपद श्याम देशपांडे यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अण्णासाहेब मिसाळ (रायगड), सुमन भांगे (नांदेड) व ए. बी. उन्हाळे (अकोला) यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. हे सर्व अधिकारी १ सप्टेंबरला आपल्या बदलीच्या नव्या जागेवर पदभार स्वीकारतील.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS