हिंसाचारात बेस्ट बसगाड्यांचे साडेसात लाखांचे नुकसान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2012

हिंसाचारात बेस्ट बसगाड्यांचे साडेसात लाखांचे नुकसान


हिंसाचारात बेस्ट बसगाड्यांचे साडेसात लाखांचे नुकसान
आसाम आणि म्यानमारमध्ये मुस्लिमांवर झालेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ मुस्लिमांच्या काही संघटनांनी शनिवारी (ता. 11) आझाद मैदानात निदर्शने केली होती. त्या वेळी अचानक सुरू झालेल्या हिंसाचारात बेस्ट उपक्रमाच्या 50 बसगाड्यांच्या 843 काचा फुटल्या. दगडफेकीत पाच दुमजली आणि 45 एकमजली बसगाड्यांचे नुकसान झाले. 
   या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी आज बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सुनील गणाचार्य यांनी केली. खटला दाखल होईल तेव्हा होईल; पण नुकसानभरपाई घ्या, असे कॉंग्रेसचे किसन जाधव म्हणाले. बेस्टला नुकसानभरपाई मिळावी यासाठी पोलिस आयुक्तांना पत्र पाठविले आहे. राज्य सरकारकडून मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविणार आहोत, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी दिली.



‘बेस्ट’ अपघाताचे प्रमाण २ टक्के
गेल्या वीस वर्षांत मुंबईतील वाहनांची संख्या तीनपट वाढली असून त्या मानाने बेस्टच्या बस अपघातांचे प्रमाण सरासरी २ टक्के एवढेच आहे, असा दावा बेस्ट प्रशासनाने आज केला.
बेस्ट समितीत कॉंग्रेसचे रवी राजा यांनी बेस्ट बसेसच्या वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले. मुंबईत बेस्ट बसेसचे २२४ डेथस्पॉट निर्माण झाले असून वरळीत सर्वाधिक १४ डेथस्पॉट असल्याचा दावा रवी राजा यांनी केला तर बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी १२४ डेथस्पॉटचा अहवाल तीन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले.
१९९१-९२ मध्ये मुंबईत ५ लाख ५७ हजार वाहने होती. त्यावेळी बेस्टचे २६१२ अपघात झाले. आता मुंबईत १८ लाख ७० हजार वाहने आहेत. त्या तुलनेत २०११-१२ मध्ये बेस्ट बसेसचे ८१४ अपघात झाल्याचे गुप्ता म्हणाले. १९९१-९२ मध्ये बस अपघातात ८७ ठार झाले. २०११-१२ मध्ये २६ जण ठार झाल्याचेही गुप्ता यांनी सांगितले. मुंबईत महिन्याला सरासरी ३ हजार अपघात होतात. त्या तुलनेत बस अपघातांची संख्या केवळ २ टक्के असल्याचा दावा त्यांनी केला. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS