रॅलीच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2012

रॅलीच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करा


रॅलीच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करा
पोलीस ठाण्यात तक्रार 
Image
म्यानमार आणि आसाम येथील बांगलादेशी घुसखोरांवर झालेल्या तथाकथित अन्यायाविरोधात गळा काढत मुंबईतील आझाद मैदानात शनिवारी शांतता रॅलीच्या नावाखाली हिंसाचार घडविणार्‍या रझा अकादमीविरोधात एफआयआर दाखल करा अशी मागणी जोगेश्‍वरी येथील एका मुस्लिम समाजसेवकाने करीत आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रझा अकादमीने शनिवारी म्यानमार आणि आसाम येथील घुसखोरांवरील कथित अन्यायाविरोधात आझाद मैदानात एका सभेचे आयोजन केले होतेे. त्यात मौलवींनी चिथावणीखोर वक्तव्य केली. त्यानंतर मुसलमानांनी हिंसाचार घडविल्याने २ जण ठार तर ४५ पोलिसांसह एकूण ५४ जण जखमी झाले होते. 
जोगेश्‍वरी येथील प्रसिद्ध समाजसेवक फरीद बटाटावाला यांनी याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘रॅलीच्या आयोजकांनी माथी भडकवणारी चिथावणीखोर भाषणे केल्याने मुस्लिम तरुणांनी जाळपोळ सुरू केली. त्यात सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. रॅलीतील तरुणांना जहाल वक्तव्यांनी प्रेरणा घेऊनच सरकारी कर्मचारी व मालमत्तेवर हल्ला केल्याचे’ या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीला एफआयआर समजून रॅलीच्या आयोजकांविरुद्ध कायद्यातील कठोर कलमे लावून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणीहीे समाजसेवक फरीद बटाटावाला यांनी केली आहे. रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी यांचा पूर्वेतिहास पाहता त्यांना या रॅलीची परवानगीच द्यायला नको होती, असे मुस्लिम महिलांची संघटना आवाज-ए-निस्वानच्या प्रमुख हसीना खान यांनी म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS