अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक सेवेचे प्रशिक्षण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक सेवेचे प्रशिक्षण

Share This

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक सेवेचे प्रशिक्षण
   मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना विमानसेवेत हवाई सुंदरी, हॉटेल व्यवस्थापन, कॅबिन क्रू, वाहतूक व्यवस्थापन, कस्टमर केअर प्रशिक्षणाची योजना राज्य सरकारच्या निधीतून राबवण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत प्रत्येक प्रशिक्षणार्थीवर अंदाजे 1 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही योजना 2012-13 या वर्षापासून सुरू होणार आहे.
   या प्रशिक्षणासाठी आणि त्यानंतर लाभार्थ्यास सेवाक्षेत्रात रोजगार प्राप्त होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक, शारिरीक पात्रता धारण करणार्‍या युवक-युवतीमधून प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येईल. यामध्ये आदिम जमातीच्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक प्रकल्प क्षेत्रातून दरवर्षी मुला-मुलींची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. ही योजना आदिवासी विभागात राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची योजना एक वर्षाची राहणार आहे. प्रशिक्षण शुल्कामध्ये प्रशिक्षणार्थ्याचे भोजन, निवास, गणवेश व अभ्यासक्रमाचे साहित्य इत्यादीचा समावेश राहील. सन 2012-13 या वर्षापासून ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी प्रत्येकी 100 प्रशिक्षणार्थी याप्रमाणे दरवर्षी 500 आदिवासी मुला-मुलींना प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कार्यक्रमावर दरवर्षी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages