निदर्शकांनी पोलिसांना तत्काळ शरण यावे - अबू आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 August 2012

निदर्शकांनी पोलिसांना तत्काळ शरण यावे - अबू आझमी


निदर्शकांनी पोलिसांना तत्काळ शरण यावे - अबू आझमी
मुंबई - आझाद मैदानावर शनिवारी निदर्शकांनी केलेला हिंसाचार पूर्णपणे चुकीचा असून समाजवादी पक्ष या हिंसाचाराचा निषेध करत असल्याचे पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या जाळपोळीत सहभागी असणार्‍या निदर्शकांनी पोलिसांना तत्काळ शरण यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
   आझमी म्हणाले की, जगभरात कोठेही घडणार्‍या हिंसाचाराचा निषेध करण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही संघटनेस आहे; मात्र निदर्शने शांततामय मार्गानेच व्हायला हवीत, असे सांगतानाच आझाद मैदानावरील तणावाची परस्थिती संयमाने हाताळल्याबद्दल आझमी यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले. शनिवारी जाळपोळीत सहभागी असणार्‍या निदर्शकांवर कठोर कारवाई करायला हवी. निदर्शनांमध्ये सहभागी असणार्‍या सरसकट कार्यकर्त्यांचे पोलिसांनी चालवलेले अटकसत्र चुकीचे आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेचे नेते शनिवारच्या घटनेला धार्मिक रंग देत असल्याचा आरोप आझमी यांनी केला. आझाद मैदानावर चिथावणीखोर भाषण करणार्‍या नेत्यांना अटक व्हायला हवी. ही घटना म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे सपशेल अपयश असल्याचेही आझमी म्हणाले. पोलिसांकडून सर्व निदर्शकांवर 302 चे गुन्हे कसे काय लावण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी केला. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS