राज ठाकरे यांच्याविरुद्ध समन्स - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2012

राज ठाकरे यांच्याविरुद्ध समन्स

नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना येथील न्यायालयाने आज समन्स बजावले आहे. उत्तर भारतीयांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल आणि त्यांच्याविरुद्धच्या हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राज यांना 28 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईत 20 ऑक्‍टोबर 2008 मध्ये घेण्यात आलेल्या रेल्वे परीक्षेच्या वेळी उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्या प्रकरणीही राज ठाकरे यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS