बँक कर्मचारी उद्यापासून २ दिवसांच्या संपावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बँक कर्मचारी उद्यापासून २ दिवसांच्या संपावर

Share This
बँक कर्मचारी उद्यापासून २ दिवसांच्या संपावर
देशातील ४७ सरकारी बँकांमधील सुमारे दहा हजार कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. आधीच सलग तीन सुट्ट्यांनंतर आज एका दिवसासाठी बँकेचे व्यवहार सुरु झाले, मात्र आता पुन्हा पुढील दोन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे. 
   बँकिंग क्षेत्रातील प्रस्तावित सुधारणा, केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या खंडेलवाल पॅनेलच्या शिफारसी आणि कामाचं आउटसोर्सिंग याला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी बँकिंग कायदा दुरुस्तीव विधेयकावर संसदेत चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे या संपात सर्वच बँक संघटनांनी सहभाग घेतला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages