पटनायक यांच्या बदलीचा प्रस्ताव ? / मनसेच्या विनापरवाना मोर्चावर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

पटनायक यांच्या बदलीचा प्रस्ताव ? / मनसेच्या विनापरवाना मोर्चावर कारवाई

पटनायक यांच्या बदलीचा प्रस्ताव ?

आझाद मैदान पसिरात 11 ऑगस्टला "रझा अकादमी'च्या मोर्चानंतर उसळलेल्या दंगलीमुळे चर्चेत असलेले मुंबईचे पोलिस आयुक्‍त अरूप पटनायक यांच्या पदोन्नतीने बदलीचा प्रस्ताव गृह खात्याने गेल्या आठवड्यातच तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
   मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर पटनायक यांच्या बदलीवर शिक्‍कामोर्तब होईल. पटनायक यांच्यासाठी तुरुंग विभागाचे महासंचालक हे नवीन पद निर्माण करण्यात येणार असल्याचे समजते. याबाबत राज्याचे गृह सचिव अमिताभ राजन यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. 
   आझाद मैदान हिंसाचाराच्या वेळी दंगलखोरांना चाप लावण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याबद्दल आयुक्त पटनायक यांना हटविण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या टीकेची धार बोथट करण्यासाठी पटनायक यांची बढतीवर बदली करण्याचे पाऊल राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात येते.

मनसेच्या विनापरवाना मोर्चावर कारवाई
परवानगी नसताना आझाद मैदानावर मोर्चा काढल्याप्रकरणी मनसेवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई हिंसाचाराच्या निषेधार्थ मनसेने सभा आणि मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र सभेलाच परवानगी असताना मनसेने मोर्चा काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मनसेच्या मोर्चाला आज लाखोंच्या संख्येने मनसैनिक उपस्थित आहेत. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS