आदिवासी महिलेचा विनयभंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2012

आदिवासी महिलेचा विनयभंग


आदिवासी महिलेचा विनयभंग
कासा : शुक्रवारी रात्री 12 वा. च्या सुमारास येणार्‍या ट्रेनमधून कामावरून घरी परतत असताना सरावली मानफोडपाडा येथील एका विवाहित आदिवासी महिलेला जबरदस्तीने अडवून विनयभंग केल्याप्रकरणी डहाणू पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोनजण अटकेत असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याबाबत नोकरी करणार्‍या महिलेवर झालेल्या अन्यायावर पोलिसांनी कठोर शासन करावे तसेच आरोपींवर अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष सिंग तंवर यांना मानफोडपाडा येथील रहिवाशांनी भेटून आदिवासी प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपींवर कारवाई करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी दीपक ऊर्फ पप्पू राजपूत आणि इम्रान तांबेळी या दोघांना डहाणू पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक ए. एम. खतीब अधिक तपास करत आहेत. 

शुक्रवारी रात्री बोईसर येथून कामावरून सरावली मानफोडपाडा येथे रस्त्याने पायी घरी जात असताना 12 वाजून 25 च्या सुमारास मिशन हॉस्पिटलसमोर बस स्टॉपजवळ काही नराधमांनी फिर्यादीचा रस्ता अडवून हात पकडून बस स्टॉप शेडमध्ये ओढून घेऊन विनयभंगाचा प्रकार घडला. तुला 500 रुपये देतो, तू आरडाओरडा करू नकोस. तुला ठार मरीन, अशी धमकी देऊन फिर्यादीस मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून माझ्याजवळ चल अशा प्रकारचे असभ्य वर्तन केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. ही घटना घडताना मध्यस्थीकरिता आलेल्या दोन इसमांना आरोपींनी ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. एका आदिवासी महिलेचा भररस्त्यात वाट अडवून विनयभंग केल्याच्या निंदनीय घटनेमुळे आदिवासी समाजात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. अनुसूचित जमातीपैकी असून पकडलेल्या इसमावर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS