शुक्रवारी पाहा 'ब्लू मून' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2012

शुक्रवारी पाहा 'ब्लू मून'


शुक्रवारी पाहा 'ब्लू मून'
मुंबई - शुक्रवारची पौर्णिमा ही नेहमीची पौर्णिमा नसून तिला विशेष महत्त्व आहे. कारण ती या महिन्यात आलेली दुसरी पौर्णिमा आहे. अशा प्रकारे एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा असतील तर त्यापैकी दुसऱ्या पौर्णिमेला "ब्लू मून' म्हणतात. दर अडीच वर्षांनी हा योग येतो, अशी माहिती नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली आहे. शुक्रवारी चंद्रोदय सायंकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी होणार आहे. 

दोन पौर्णिमांमधील अंतर 29 दिवस, 12 तास, 44 मिनिटे आणि 38 सेकंदांचे असते. म्हणजेच साधारणपणे साडेएकोणतीस दिवस. त्यामुळे 30 किंवा 31 दिवसांच्या महिन्यात एकदाच पौर्णिमा येते. जर आधीची पौर्णिमा महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला आली तर त्या महिन्यात दोन वेळा पौर्णिमांचा योग जुळून येतो. ऑगस्टमध्ये पहिली पौर्णिमा 2 तारखेला आल्याने हा योग जुळून आला आहे. 

याबाबत अरविंद परांजपे म्हणाले, "ब्लू मून म्हणजे चंद्र निळ्या रंगाचा दिसणार आहे, असा समज कुणी करून घेऊ नये. ब्लू मून ही संकल्पना विशेषत: परदेशातली आहे. भारतात ही संकल्पना प्रचलित नाही. खगोलशास्त्रातल्या लेखकांनी महिन्याच्या या दुसऱ्या पौर्णिमेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी "ब्लू मून' ही संकल्पना प्रचलित केली.' यापूर्वीचा "ब्लू मून' 30 मार्च 2010 रोजी होता. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS