मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली तरी काँग्रेस प्रवेश नाही - गोपीनाथ मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली तरी काँग्रेस प्रवेश नाही - गोपीनाथ मुंडे

मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली तरी काँग्रेस प्रवेश नाही - गोपीनाथ मुंडे
गोपीनाथ मुंडे
मुख्यमंत्रिपदाची ऑफर मिळाली तरी आपण काँग्रेसमध्ये जाणार नाही असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. विलासरावांच्या निधनानंतर मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली, मात्र ही केवळ अफवा असल्याचं सांगताना मुंडेंनी काँग्रेस प्रवेशाची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. 
    गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं भाजप नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपमध्ये चांगली परिस्थिती असताना मुंडे काँग्रेसमध्ये जाणार नाहीत असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला आहे. तसंच सेना, भाजप आणि मनसेला एकत्र आणण्याची ताकद मुंडेंमध्ये असल्याचं कौतुकही यावेळी तावडेंनी केलं.
     विलासरावांच्या निधनानंतर मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. आश्चर्य म्हणजे तावडेंसारख्या भाजपच्या विरोधी पक्ष नेत्यानं त्यावर भाष्य करून चर्चा असल्याचं तरी सिद्ध केलय. विशेष म्हणजे मुंडेंना मुख्यमंत्रिपदाची संधी असल्याचंही जाहीर करून टाकलं.
     गोपीनाथ मुंडे यांनी आतापर्यंत दोन वेळेस भाजपात राहून बंड केलं आहे. त्यातील पहिलं बंड यशस्वी झालं तर दुसऱ्या वेळेस मुंडे तोंडावर पडले. विशेष म्हणजे दुसऱ्या वेळेस ते काँग्रेस प्रवेशाला निघाले होते, सगळं पक्क झाल्याची चर्चाही रंगली आणि अचानक मुंडे काँग्रेस दारावरून परत आले. विलासरावांनीच मुंडेंचा काँग्रेस पत्ता शेवटच्या क्षणी कापल्याची चर्चा अजूनही आहे. पण खोटं असल्याचा दावा मुंडे करत आहेत.
      विलासरावांच्या निधनानंतर मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा ही साहजिक आहे. मराठवाड्यात आता मुंडेंशिवाय मोठं नेतृत्त्व कुठल्याच पक्षात नाहीत. काँग्रेसला एका नव्या चेहऱ्याची गरज आहे जे मुंडे देऊ शकतात. पण मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली तरी काँग्रेस प्रवेश नाही असा विश्वास मुंडे व्यक्त करत आहेत. मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनीही फेटाळून लावली आहे. खुद्द मुंडेही भाजपावर नाराज नसल्याचं निक्षून सांगत आहेत

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS