रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 August 2012

रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता?

रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता?
 
मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीचे नवे भाडेपत्रक ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या हकीम समितीचा अहवाल राज्य सरकारने परिवहन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. हकीम समितीने पहिला टप्पा 1.6 किमीवरून 1 पर्यंत घटवण्याची शिफारस यामध्ये केली आहे.

या अहवालास राज्य सरकाने मान्यता दिल्यास रिक्षा आणि टॅक्सीचे पहिल्या टप्यातील भाडे अनुक्रमे 18 आणि 22 रूपयेपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.भाडेवाढ करताना राहणीमानाचा खर्च 12 हजार, मीटरमध्ये 

फेरफार करणार्‍या चालकांवर कडक कारवाई, भाडेपत्रकावर परवाना क्र. चालकाचे नाव व फोटो, शेअर टॅक्सीला प्रोत्साहन, दरवर्षी 1 मे रोजी भाडय़ात बदल करणे, भाडे निश्चित करताना वार्षिक व्याज आणि घसारा या दोन बाबी विचारात घ्यावे, अशा शिफारसी केल्या आहेत. प्रति किलोमीटरच्या दीडपट भाडे निश्चित करणे ही या शिफारशीमधील सर्वात महत्त्वाची बाब आहे. या शिवाय रिक्षांना जाहिरातीसाठी परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.पहिल्या टप्यातील भाडेवाढ प्रत्यक्षात अमलात आल्यास त्याचा राज्यातील बहुतांश जनतेला त्याचा फटका बसणार आहे . 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS