मुख्यमंत्र्यांनी कॉँग्रेस निधर्मी नसल्याचे दाखवले - शरद राव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 August 2012

मुख्यमंत्र्यांनी कॉँग्रेस निधर्मी नसल्याचे दाखवले - शरद राव


मुख्यमंत्र्यांनी कॉँग्रेस निधर्मी नसल्याचे दाखवले - शरद राव
काँग्रेसही निधर्मीवादी नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारानंतर दाखवून दिले असल्याचा आरोप कामगार नेते शरद राव यांनी केला आहे. शुक्रवारी ते मुंबईत पत्रकार परिषदेत  बोलत होते. या हिंसाचारानंतर शिवसेना आणि मनसेसारख्या हिंसाचाराचा फायदा  घेणा-या पक्षांना त्यांनी पाठबळ देण्याचे काम केल्याचा आरोप राव यांनी केला आहे.

राष्ट्रवादीकडील गृहखाते काढून घेण्यासाठी त्यांनी  मनसेला मोर्चासाठी पाठबळ दिल्याचेही राव यांनी सांगितले. मुंबईत ही दंगल पसरावी, हा काही जणांचा प्रयत्न होता. मात्र, तत्कालीन पोलिस आयुक्त अरुप पटनायक आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तो हाणून पाडला आणि परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल त्यांचे लाखो कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS