मध्य रेल्वेच्या पहिल्या हिंदी डिजिटल ई-पत्रिकेचे प्रकाशन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2012

मध्य रेल्वेच्या पहिल्या हिंदी डिजिटल ई-पत्रिकेचे प्रकाशन

मध्य रेल्वेच्या पहिल्या हिंदी डिजिटल ई-पत्रिकेचे प्रकाशनमुंबई  - मध्य रेल्वेने प्रथमच तयार केलेल्या हिंदी डिजिटल ’सृजन’ या ई-पत्रिकेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. हिंदुस्थानी रेल्वेच्या इतिहासात ई-पत्रिकेची निर्मिती करून असा अभिनव उपक्रम करणारी मध्य रेल्वे पहिली ठरली आहे.


सिव्हिल इंजिनीअरिंगसारख्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या अनेक विषयांचा या पत्रिकेत समावेश करण्यात आला आहे. कागदाचा वापर न करता पर्यावरणाला अनुकूल ठरेल या संकल्पनेतून ही डिजिटल पत्रिका तयार करण्यात आली आहे. नव्या डिजिटल स्वरूपातील ई-पत्रिकेचा लाभ केवळ रेल्वे कर्मचारी नव्हे, तर इंटरनेटवरून जगभरातील वाचकांना मिळणार आहे. या प्रकाशन सोहोळ्यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी एम. के. गुप्ता, मुख्य अभियंता पी. के. सक्सेना, ए. के. अग्रवाल उपस्थित होते. ई-पत्रिका तयार करण्यासाठी राजभाषा अधीक्षिक विनिता फाटक, प्रभा वाघमारे, मुख्य जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर, ए. के. सिंह आदींनी विशेष परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS