देशभरात शांततेची गरज

आसाम आणि म्यानमारमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या निषेधार्थ सीएसटीसमोरील आझाद मैदानात आसाम आणि म्यानमारमधील अत्याचाराच्या निषेधार्ध रझा अकादमी, सुन्नी जमाइतुल उलेमा आदी संघटनांनी आझाद मैदानवर झालेल्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे दोन ठार, तर 54 जण जखमी झाले. जखमींमध्ये 41 पोलिसांचा समावेश आहे. ही निदर्शने सुरु असताना दुपारी निदर्शन करणाऱ्या जमावाने अचानक आझाद मैदान परिसरातील वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात करून वाहनांना आगी लावण्यास सुरुवात केली. आंदोलक हिंसक बनले आणि जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला..
सुमारे १० हजाराच्या या जमावातील काही आंदोलनकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यास सुरुवात केली. परिसरात उभ्या असलेल्या गाड्या फोडण्यात आल्या. काहींना आग लावण्यात आली. या प्रकरणी कित्तेकाना अद्याप अटक करण्यात आली आहे. परंतु असे दंगे घडवणाऱ्या कारणीभूत असलेल्या लोकांपर्यंत पोहचण्यास अद्याप पोलिसांना अपयश आले आहे पोलीस या दंग्यांमध्ये सर्वाधिक जास्त जखमी झाले असताना महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केले तरीही परिस्थिती पोलिसांनी चांगल्या प्रकारे हाताळल्याने दंगे घडवण्याचा एक मोठा कट पोलिसांनी उधळून लावला आहे यासाठी मुंबई पोलिसांना शाब्बासकी द्यावीच लागेल.
मुंबई पोलिसांनी हा कट उधळून लावला असला तरी या दंग्यांमुळे संपूर्ण भारतात ईशान्येकडील लोकांविरुद्ध एसएमएस आणि एमएमएस तसेच पोस्टर द्वारे एका विशिष्ट समुदायात असंतोष पसरला आहे. यामुळे ईशान्येकडील लोकांना धमकावले जात असल्याने या लोकांनी परत आपल्या घरी परतण्यास सुरवात केली आहे. एकीकडे धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांकडून एकीकडे वातावरण तंग व गरम कसे राहील यासाठी मिडीया मध्ये बातम्या पसरवल्या जात असतानाच समाजामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत लोकांनी पत्रकार परिषदा घेवून काही असंतुष्ट परकीय देशांकडून भारतात अराजकता पसरावाण्यासाठीचा कट आहे हे सांगून याच्या चौकशीची मागणी केली आहे. या दंग्यामागे परकीय शक्तीचा हात असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
ईशान्येकडील लोकांविरुद्ध देशभरात पसरवले जाणारे एसएमएस आणि एमएमएस पाकिस्तानातून पाठवण्यात येत आहेत, असा दावा केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंह यांनी केला आहे. जगभरातील भूकंप, चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बळी जाणा-यांचे मृतदेह या साइटवर टाकण्यात आले आहेत. त्यानंतर हे लोक आसाम हिंसाचारात मारले गेल्याचे म्हटले आहे. हा प्रकार निषेधार्ह आहे. हा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित केला जाईल, असेही सिंह यांनी म्हटले आहे. चार दिवसांपासून दक्षिणेतील राज्यांत ईशान्यवासीयांच्या विरोधात एसएमएस पाठवले जात आहेत.
दरम्यान, दक्षिण भारतात सुरू झालेले हे दहशतीच्या एसएमएसचे लोण शनिवारी दिल्लीतही धडकले. तथापि, पोलिसांनी ईशान्यवासीयांना सुरक्षेची ग्वाही दिली आहे. त्यातच शनिवारी अलाहाबादेत लागू करण्यात आलेली संचारबंदीही हटवण्यात आली आहे. सीबीआयने आसाममधील हिंसाचाराची माहिती देणा-यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अफवांच्या चौथ्या दिवशीही बंगळुरूमधून ईशान्यवासीयांचे पलायन सुरूच होते. गृह सचिव सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानच्या 76 वेबसाइट्सची ओळख पटवण्यात आली आहे. यावर फोटो एडिट करून अपलोड करण्यात आले आहेत. या वेबसाइट्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
पुण्यामधून ईशान्यवासीयांनी पलायन केल्या नंतर गेल्या चार दिवसांत एकट्या बंगळुरूमधून 30 हजार लोकांनी पलायन केले आहे. त्याच वेळी चेन्नई, पुणे, मुंबई आणि हैदराबादेतूनही पलायन सुरूच आहे. आसाम हिंसाचार देशभर पसरविणाऱ्या दंगलखोरांची माहिती देणाऱ्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. ज्यांना या दंगलखोरांची माहिती द्यावयाची असेल ते 08811099997 / 08811099996 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्याची काळजी सीबीआयमार्फत घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे.
तरी याबाबतचा विचार करता सर्व देशवासीयांनी अश्या अफवा, , एसएमएस आणि एमएमएस , पोस्टर याची शहानिशा करण्याची गरज आहे. उगाच कोणी काही अफवा पसरवली म्हणून दंगे करून देशातील शांतात बिघडवण्याची गरज नाही. देशातील शांतता व देशातील लोकांची बंधुत्वाची भावना बिघडवण्यासाठी असे प्रयत्न होत असतात अशावेळी देशवासीयांनी शांतात पाळून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment