तरुणांनो, आशावादी रहा - डॉ. मनमोहन सिंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 August 2012

तरुणांनो, आशावादी रहा - डॉ. मनमोहन सिंग


तरुणांनो, आशावादी रहा - डॉ. मनमोहन सिंग 



गेल्या काही काळापासून आपण अती नैराश्य आणि नकारात्मकतेचा सामना करत आहोत. आपला समाज सध्या वाढत्या अपेक्षांच्या क्रांतीचा अनुभव घेतो आहे. अपेक्षा वाढलेल्या आहेत पण त्या सगळ्याच पूर्ण होत नाहीत. या सगळ्याचा सामना करून आशावाद कायम राखण्याचे उमेद नगमावण्याचे मोठे आव्हान तरुणांसमोर आहे असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबई आयआयटीच्या सुवर्णमहोत्सवी दिक्षांत सोहळ्यात शनिवारी केले.
गेल्या ६५ वर्षांत देशाने वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रगती केली आहे. परंतु त्यातून सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. विशेषतः तरुणाई असमाधानी आहे अशी दखलही पंतप्रधानांनी घेतली. आजवरच्या विकासामुळे​ मिळालेल्या आत्म​विश्वासाच्या बळावर त्या अपेक्षांचीही पूर्तता करू असेही डॉ. सिंग म्हणाले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे देशात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. आता शिक्षित तरुणांनी सामाजिक आणि आर्थिक बदलांच्या प्रक्रियेचे नेतृत्व करावे. प्रक्रियांच्या बदलांचा झेंडा आमच्या हातातून घेऊन पुढे नेण्यासाठी तुमच्यासारखे तरुण तयार आहेत याबद्दल शंकाच नाही. भावी पिढी आम्हाला अभिमानास्पद असे काम करील. देशाच्या भविष्याबाबत मी आशावादी आहे. कारण तुम्हीच देशाचे भवितव्य आहात अशा शब्दांत पंतप्रधानांनी युवावर्गाला साद घालण्याचा प्रयत्न केला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS