विलासराव देशमुख यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 August 2012

विलासराव देशमुख यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

विलासराव देशमुख यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार 
दिलखुलास विलासराव अनंतात विलीन, अमित यांनी दिला मुखाग्नी
 केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आज सायंकाळी पाचच्या सुमारास अनंतात विलीन झाले. विलासराव देशमुख यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या १७ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
   आज दुपारी त्यांच्या अंत्ययात्रेला बाभळगाव येथील त्यांच्या निवासस्थानापासून सुरवात झाली. तेथून जवळच असलेल्या त्यांच्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विलासराव देशमुख यांचा मोठा मुलगा अमित देशमुख यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
   विलासराव देशमुख यांचे मंगळवारी चेन्नईतील ग्लोबल रुग्णालयात निधन झाले होते. आज सकाळी त्यांना लातूरहून बाभळगावमध्ये आणण्यात आले होते. बाभळगावमधील दयानंद हायस्कूलच्या मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव देशमुख गढी येथे त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्याठिकाणाहून अंत्ययात्रेस सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

पंतप्रधान, सोनियांकडून विलासरावांना श्रद्धांजली
दिलखुलास विलासराव अनंतात विलीन, अमित यांनी दिला मुखाग्नी
दिलखुलास विलासराव अनंतात विलीन, अमित यांनी दिला मुखाग्नीदिलखुलास विलासराव अनंतात विलीन, अमित यांनी दिला मुखाग्नी
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या मूळ गावी बाभळगाव येथे आज (बुधवार) दुपारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. 
   केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, केंद्रीय मंत्री वायलर रवी, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार राजीव शुक्ला, खासदार गोपीनाथ मुंडे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष (आठवले गट) रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय निरुपम, मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. बाभळगावमध्ये सुमारे पाच लाख नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS