पाकिस्तानला पुरावे देणार - शिंदे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

पाकिस्तानला पुरावे देणार - शिंदे

पाकिस्तानला पुरावे देणार - शिंदे

ईशान्येकडील नागरिकांमध्ये सोशल नेटवर्किंग साईट्सवरून घबराट पसरविण्यामागे पाकिस्तानमधील संघटनांचा हात असल्याने, याबाबतचे पुरावे पाकिस्तानला देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (सोमवार) दिली.
  शिंदे म्हणाले, की अफवा पसरविण्यामागे पाकिस्तानमधील वेबसाईट्सचा सहभाग असल्याचे पुरावे लवकरच पाकिस्तानला देण्यात येतील. या प्रकरणी शिंदे यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत सांगितले, की भारतामध्ये धार्मिक तणाव वाढण्यासाठी पाकिस्तानमधील वेबसाईट्सकडून आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो अपलोड करण्यात येत आहेत. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS