जपानी नागरिकांनी फडकावला वादग्रस्त बेटावर राष्ट्रध्वज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

जपानी नागरिकांनी फडकावला वादग्रस्त बेटावर राष्ट्रध्वज

जपानी नागरिकांनी फडकावला वादग्रस्त बेटावर राष्ट्रध्वज
चीनसोबत वाद असलेल्या बेटावर राष्ट्रवादी म्हणविणार्‍या जपानच्या नागरिकांनी आज राष्ट्रध्वज फडकावला. त्यांच्या या कृतीमुळे भविष्यात चीन आणि जपानचे संबंध तणावपूर्ण होऊ शकतात. 
गॅम्बर निप्पन संघटनेचे सहा सदस्य नावेद्वारे बेटाजवळ पोहोचले. या बेटाला जपानमध्ये सेनकाकू तर चीनमध्ये दियाओयू असे संबोधले जाते व दोन्ही देश त्यावर मालकीचा दावा करतात. त्यावरून उभय देशांत तणाव आहे. आठ संसद सदस्यांसह १५0 सदस्यांनी पाच तास बेटावर तळ ठोकला होता. 
जपानी तटरक्षक दलाने कार्यकर्त्यांना नावेवरून उतरू नका, असे फर्मावले होते. काही दिवसांपूर्वी जपानने याच बेटावर आलेल्या १४ चिनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना परत चीनला पाठविले होते. हे सर्व कार्यकर्ते हाँगकाँगचे रहिवासी होते. चीननेही जपानच्या नागरिकांच्या कृत्याला विरोध दर्शविला आहे. चीनमधील अनेक शहरांत या दौर्‍याविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. येथील पर्वतावर आम्हाला जपानी संस्कृतीचे अवशेष आढळले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS