सात सोशल नेटवर्किग साईट्सवर बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2012

सात सोशल नेटवर्किग साईट्सवर बंदी


मुंबई : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील 'इनोसन्स ऑफ मुस्लीम' ही वादग्रस्त फिल्म दाखवणार्‍या सात सोशल नेटवर्किग साईट्सवर बंदी घालण्यात आली असून आणखीन तीन वेबसाईट्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बुधवारी मुंबई हायकोर्टात एका जनहित याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. या वादग्रस्त फिल्मवरून पश्चिम आशियाई देशांमध्ये दंगली उसळल्या होत्या. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित अवमानकारक व विपर्यस्त चित्रण या फिल्ममध्ये आहे. या फिल्मवर बंदी घातलेली असली तरी गुगल, यूटय़ुबच्या माध्यमातून या फिल्मचे वितरण सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रसिद्धी व वितरणावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी अमीन इद्रिसी यांनी मुंबई उच्च न्यायालात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झाली. त्यावर सरकारच्या वतीने अँड. रेवती डेर यांनी सरकारने या लघुपटावर यापूर्वीच बंदी घातलेली आहे. तसेच 10 पैकी 7 वेबसाईट्सवरून हा लघुचित्रपट काढून टाकण्यात आला, तर उर्वरित तीन वेबसाईट्सवरून काढून टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने याची दखल घेऊन काय कारवाई केली, याचा अहवाल देण्याचा आदेश सरकारला दिला.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS