मुंबईत स्फोटाची धमकी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2012

मुंबईत स्फोटाची धमकी


मुंबईत स्फोटाची धमकी


चेंबूर आणि ट्रॉम्बे भागात कोणत्याही दिवशी सायंकाळी 7.00 वाजता बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणार्‍या पत्रामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. वसमतचे तीन तरुण हा घातपात घडवून आणणार असल्याचे या पत्रात नमूद आहे. एटीएसप्रमुख मारिया यांनी पत्राला दुजोरा दिला आहे.

अज्ञात व्यक्तीने पाठवलेले धमकीपत्र चेंबूर पोलिसांना 14 ऑगस्ट रोजी मिळाले. या पत्रामध्ये मराठवाड्यातील वसमत गावच्या तीन तरुणांनी चेंबूर आणि ट्रॉम्बेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती देण्यात आली आहे. बीएआरसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल या संस्थांवर निशाणा साधण्यासाठी चेंबूरमधील जामा स्वीट्सनजीक स्फोटकाने भरलेल्या कारद्वारे स्फोट घडवून आणला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

धमकीपत्र चेंबूरमधून पाठवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. पत्रावरील टपाल खात्याचा शिक्का चेंबूर येथील टपाल कार्यालयाचाच आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने याला दुजोरा दिला आहे. पत्र चेंबूरमधून पाठवण्यात आले अन्य ठिकाणाहून नाही. त्यामध्ये संबंधित ठिकाणी कोणत्याही दिवशी सायंकाळी 7.00 वाजता स्फोट घडवून आणण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

पोलिस यंत्रणेला अडचणीत आणण्यासाठी अथवा खोडसाळपणा करण्यासाठी एखाद्याने धमकीचे पत्र पाठवले असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते. मात्र, हा इशारा आम्ही सहजतेने घेत नाही, असे अधिकार्‍याने सांगितले. चेंबूर आणि ट्रॉम्बेमधील महत्त्वाच्या संस्थांवर निशाणा साधण्याबाबतची 2-3 पत्रे या आठवड्यात प्राप्त झाली आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS