| मोबाईल पेमेंटला आरबीआयचा नकार मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी मोबाईल फोनच्या माध्यमातून रोख पेमेंट करण्याची सेवा सुरू करण्याचा मोबाईल कंपन्यांचा प्रस्ताव नामंजूर केला. जोपर्यंत या कंपन्या आपल्या या पेमेंट पद्धतीस बँकांच्या व्यावसायिक प्रतिनिधीचे रूप देत नाहीत तोपर्यंत या कंपन्यांना मोबाईल पेमेंट सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली जाणार नाही, असे कारण आरबीआयने प्रस्ताव फेटाळताना दिले आहे. फिक्की-आयबीआय बँकिंग शिखर संमेलनादरम्यान बोलताना आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी ही माहिती दिली आहे. आरबीआय मोबाईल नेटवर्क ऑपरेटरना रोख पेमेंट करण्याची सेवा देऊ शकत नाही. बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष होता नये, असे आमचे स्पष्ट मत आहे; पण या कंपन्या बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यास तयार असतील तर मात्र मोबाईल ऑपरेटरना मोबाईल फोनच्या माध्यमातून रोख पेमेंट करण्याची परवानगी देण्यात येईल, असे खान म्हणाले. |
Post Top Ad
06 September 2012
Home
Unlabelled
मोबाईल पेमेंटला आरबीआयचा नकार
मोबाईल पेमेंटला आरबीआयचा नकार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment