| आता सोशल नेटवर्किगवर बँकिंग व्यवहार नवी दिल्ली : भारतातील तिसरी मोठी खाजगी बँक असणार्या आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना सोशल नेटवर्किग साइट फेसबुकवरून व्यवहार करण्याच्या दृष्टीने परवानगी दिली आहे. मुंबई मुख्यालयातील बँकेचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मुकेशकुमार जैन यांनी बुधवारी ही माहिती दिली. बँकेचे फेसबुकशी संबंधित आठ लाख ग्राहक असून, या ग्राहकांना सोशल नेटवर्कच्या माध्यमातून बँकिंग सेवा देणारी आयसीआयसीआय बँक ही जगातील पहिली बँक बनली आहे, असे मुकेशकुमार जैन यांनी सांगितले. फेसबुक कशा पद्धतीने आणि कोणत्या सेवा मिळतील, हे आताच सांगता येणार नाही; पण आम्ही फेसबुकवरून व्यवहार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. येत्या काही दिवसांत यासंबंधीचा निर्णय होईल, अशी माहिती मुकेशकुमार जैन यांनी दिली. तरुणवर्ग फेसबुकशी मोठय़ा प्रमाणात जोडलेला आहे, त्यांना आम्ही बचत खात्यांची माहिती देण्यास सक्षम आहोत, असे त्यांनी सांगितले. बँकेच्या ग्राहकांना काही सेवांची मागणी करणे, बँक स्टेटमेंट पाहणे, खात्याची माहिती घेणे, चेकबुकची मागणी आणि डेबिट कार्डचे अपग्रेडेशन फेसबुकवर करता येईल. बँकिंग सुरक्षा आणि वैयक्तिक खात्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सेवा देण्याचा बँकेचा प्रयत्न राहील. फेसबुकवर व्यक्तिगत माहिती जशी सर्वाना खुली होते, अशा स्वरूपात बँकिंग व्यवहाराची माहिती सर्वाना दिसणार नाही, याची काळजी बँक घेईल, असे मुकेशकुमार जैन यांनी सांगितले. |
Post Top Ad
06 September 2012
Home
Unlabelled
आता सोशल नेटवर्किगवर बँकिंग व्यवहार
आता सोशल नेटवर्किगवर बँकिंग व्यवहार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment