आझाद मैदान दंगल / आणखी दोघांची निर्दोष मुक्तता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2012

आझाद मैदान दंगल / आणखी दोघांची निर्दोष मुक्तता

आझाद मैदान  दंगलआणखी दोघांची निर्दोष मुक्तता
मुंबई : आझाद मैदान दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दंगेखोरांपैकी दोघांना न्यायालयाने पुराव्याअभावी निदरेष मुक्त केले. आतापर्यंत या प्रकरणातील 5 जणांची मुक्तता करण्यात आल्याने अटक असलेल्यांची संख्या 53 वर पोहोचली आहे.

11 ऑगस्ट रोजी आझाद मैदान परिसरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांपैकी आणखी दोघांना न्यायालयाने दोषमुक्त केले. अमिन युसूफ शेख आणि सलीम मेहताब शेख अशी सुटका करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांनी आपण आझाद मैदान हिंसाचारात सहभागी नव्हतो, असे न्यायालयाकडे केलेल्या अर्जात म्हटले होते. या प्रकरणातील दंगेखोरांपैकी सुटका करण्यात आलेल्यांची संख्या 5 झाली आहे. याआधी 27 ऑगस्ट रोजी तिघा संशयितांना न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोडून दिले होते. आता या प्रकरणात 53 दंगेखोर गजाआड असून त्यापैकी 5 जणांचा महिला पोलिसांच्या विनयभंगात सहभाग असल्याचे उघड झाल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून उघड करण्यात आले. अद्याप या हिंसाचार प्रकरणात 150 दंगेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांची चेहरेपट्टी आझाद मैदान परिसरात लागलेल्या 66 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे पोलिसांना मिळाली असल्याचे सांगण्यात येते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS