मलिक राष्ट्रवादीचे नवे प्रवक्ते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2012

मलिक राष्ट्रवादीचे नवे प्रवक्ते

मलिक राष्ट्रवादीचे नवे प्रवक्ते

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते मदन बाफना यांनी मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्याबरोबर झालेले मतभेद विकोपाला गेल्याने बाफना यांनी प्रवक्तेपद सोडले असे बोलले जाते. त्यांच्या जागी माजी मंत्री नवाब मलिक यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून पिचड आणि बाफना यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते. अनेक महत्त्वाच्या बैठकांना बाफना यांना निमंत्रित केले जात नव्हते. त्यामुळे पत्रकारांना माहिती देताना बाफना यांची पंचाईत व्हायची. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गोटातील म्हणून ओळखले जाणारे बाफना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्यात फारसे यशस्वी झाले नाहीत. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी खासदार संजय पाटील यांची नेमणूक करण्याच्या विषयावरही बाफना भरडले गेले होते. संजय पाटील यांची नेमणूक करण्याचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मानस आहे, तर अजित पवार यांचा या गोष्टीला विरोध आहे. किरण पावसकर यांच्या नावाला त्यांनी पसंती दिली आहे. अशा स्थितीत गाजावाजा न करता गुपचूप पाटील यांच्याकडे सूत्रे सोपवण्याचा पक्षाध्यक्षांचा प्रयत्न होता. ही बातमी प्रसारमाध्यमांमधून उजेडात आली आणि संजय पाटील यांच्या बाजूने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. बाफना यांनीच यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा संशय घेऊन त्यात बाफना यांना बरेच काही ऐकावे लागले असे समजते. नवाब मलिक यांना मुख्य प्रवक्ते पद देण्यामागे मुस्लिमांना पक्षाबरोबर बांधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही जाणकारांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS